चहा बनवून दिला नाही म्हणून त्याने बायकोला झोडपली अन्...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

उमा बोल्ली या पती राजू समवेत शंकर रामा लोखंडे यांच्या पोल्ट्रीशेड जवळील रूममध्ये राहत होत्या.

कामशेत (पुणे) : चहा बनवून दिला नाही म्हणून मावळ तालुक्यातील लोखंडवाडी येथे नवऱ्याने बायकोला लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या बायकोचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. तिच्या नवर्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

उमा राजू बोल्ली (वय ३९, रा. करूंज, लोखंडवाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी शंकर रामा लोखंडे यांनी पोलिसात तक्रार दिली. या विवाहितेचा पती राजू नारायण बोल्ली (वय ४२, रा. करूंज, लोखंडवाडी; मूळ रा. गांधीनगर, झोपडपट्टी नं. ७, अक्कलकोट जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला.

विधानपरिषदेसाठी मोहिते-पाटील इच्छुक; राष्ट्रवादी तिकीट देणार?​

पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा बोल्ली या पती राजू समवेत शंकर रामा लोखंडे यांच्या पोल्ट्रीशेड जवळील रूममध्ये राहत होत्या. शनिवारी (ता. १) सायंकाळी सहाच्या सुमारास राजूने उमा यांच्याकडे चहा मागितला, पण त्यांनी नकार दिला. त्याचा राग मनात धरून राजूने त्यांना लोखंडी पाईपने मारहाण केली.

या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि शनिवारी (ता.८) दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रविवारी (ता.९) पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी राजू बोल्लीला ताब्यात घेतले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband beat his wife with an iron pipe for not making tea