पुणे : पत्नीचा घेतला चावा; ठरले घटस्फोटाचे कारण

husband bite his wife on her wrist gets divorce
husband bite his wife on her wrist gets divorce

पुणे : कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, नियमित संशय घेणे अशा विविध कारणांमुळे जोडप्याचा घटस्फोट झाल्याचे अनेक प्रकरणे आपण पाहिले आहेत. या सर्वांत क्रूरतेचे प्रमाण अल्प असते. मात्र भांडण झाल्यानंतर पत्नीच्या मनगटाला जोराचा चावा घेतल्याने दांपत्य कायमचे विभक्त झाल्याचा एक प्रकार पुढे आला आहे.

गुंड प्रवृत्तीच्या पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून क्रुरतेच्या मुद्यावर पत्नीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा न्यायालयाने मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. नाईकवडे यांना हा घटस्फोट मंजूर केला. रमेश आणि सोनल (नावे बदललेली) असे या जोडीचे नाव. त्यांचा 13 मार्च 2014 रोजी प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार मुले देखील आहेत. रमेश हा गुंडगिरी करीत असल्याने त्याला अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहे. बाहेरप्रमाणे त्यांचा घरातही रुबाब असे. तो सोनल यांच्यावर संशय घेत. तसेच त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत. मुलांच्या भविष्याचा विचार करून सोनल हा सर्व प्रकार सहन करीत होत्या. मात्र 2017 सप्टेंबर मध्ये भांडण झाल्यानंतर रमेशने सोनल यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला जोरदार चावा घेतला. हा चावा इतका जबर होता की त्यांची त्वचा लोंबकळत होती. त्यामुळे रमेशविरोधात मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली होती.

फाशीपासून वाचण्यासाठी निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीची नवी चाल

पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे सोनल यांनी घटस्फोट मिळावा म्हणून ऍड. सागर नेवसे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. मात्र रमेशने न्यायालयात परस्परसंमतीने घटस्फोट घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांनी वेगळे होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या अटी ठरविल्या. मात्र त्यानंतर तो न्यायालयात येणे टाळू लागला.

पत्नीला टाळणे हा देखील छळ
रमेश विरोधातील पुरावे दाखल करीत त्याच्या गुंडगिरीची माहिती ऍड. नेवसे यांनी न्यायालयास सांगितले. सोनल यांच्या मनगटाला झालेल्या इजेचा अहवाल त्यांनी दाखल केला. परस्परसंमतीने घटस्फोटाच्या अटी ठरवल्यानंतरही तो हजर होत नसून पत्नीला टाळणे हा देखील छळ असल्याचे ऍड. नेवसे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने सोनल याचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com