'त्या' चिमुकलीची काय चूक? आधी पत्नीचा केला खून मग पतीने...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पिंपरी : पत्नीचा गळा आवळून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे मंगळवारी (ता . 14) सकाळी उघडकीस आली. या दांम्पत्याला सात वर्षांची मुलगी असून पोरकी झाली आहे.

निर्दयी! पुण्यात एक दिवसांच्या जुळ्यांना ऐन थंडीत फेकून दिले तलावाशेजारी

प्रियंका देशमुख (रा. शास्त्री चौक, भोसरी) असे पत्नीचे नाव आहे. तर निलेश देशमुख असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. निलेश याने राहत्या घरी पत्नी प्रियंकाचा खून करून स्वतः ही गळफास घेतला. ही घटना सकाळी उघडकीस आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दाम्पत्याला सात वर्षांची मुलगी आहे. आर्थिक चणचणीतून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband commits suicide by murdering his wife in Pimpri