पुणे : मालिका बघण्यासाठी रिमोट दिला नाही म्हणून पतीने....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

चित्रपट पाहणाऱ्या पत्नीला आपल्याला टीव्हीवरील मालिका पाहायची असल्याचे सांगून तिच्याकडे रिमोटची मागणी केली. मात्र आपल्या आवडीचा चित्रपट असल्यामुळे पत्नीने त्यास रिमोट देण्यास विरोध दर्शविला.

पुणे : टीव्हीवरील मालिका पाहण्याचे वेड असलेल्या पतीने आपल्या आवडीचा चित्रपट पाहणाऱ्या पत्नीस टीव्हीचा रिमोट मागितला. मात्र, पतीने त्यास विरोध दर्शविला. या इतक्‍याशा कारणामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीचा गळा दाबून हाताला कडाडून चावा घेत तिला जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी (ता.5) रात्री कात्रजमधील शिवशंभो नगर परिसरात घडली. 

- जेवणानंतर कधीच करु नका 'या' पाच गोष्टी!

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 39 वर्षीय पतीला अटक केली. 30 वर्षीय पत्नीने ही फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचे 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. फिर्यादी एका इलेक्‍ट्रॉनिक वस्तू बनविणाऱ्या कंपनीमध्ये कामाला आहेत. तर पतीही एका खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. पतीला दारूचे व्यसन असून टीव्हीवरील मालिका पाहण्याची आवड आहे.

- बापरे ! दीपिकाच्या 'या' बॅगची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

नेहमीप्रमाणे मंगळवारी सायंकाळी फिर्यादी यांनी कामावरून घरी येऊन स्वयंपाक केला. त्यानंतर टीव्ही सुरू करून त्या त्यांच्या आवडीचा चित्रपट पाहात बसल्या होत्या. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा पती कामावरून घरी आला. त्याने त्याने चित्रपट पाहणाऱ्या पत्नीला आपल्याला टीव्हीवरील मालिका पाहायची असल्याचे सांगून तिच्याकडे रिमोटची मागणी केली. मात्र आपल्या आवडीचा चित्रपट असल्यामुळे पत्नीने त्यास रिमोट देण्यास विरोध दर्शविला.

- 'या' विद्यापीठातील मुलींना धमकी : मुलांशी बोलल्यास पालकांना फोटो पाठवू 

या प्रकारामुळे पतीच्या रागाचा पारा चढला. त्याने पत्नीस शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. पत्नीनेही त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने पत्नीचा गळा दाबून तिच्या डाव्या हाताच्या दंडाला कडाडून चावा घेतला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर.चिवडशेट्टी करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband lashes out his wife for not giving TV remote to watch series