पुणे : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. .सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा निकाल दिला. अजय अंकुश निकाळजे (वय २२, रा. त्रिमूर्ती हॉस्पिटलजवळ, धायरी फाटा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. त्याने पत्नी दिशा निकाळजे (वय १९) यांचा खून केला होता. .ही घटना २० ऑगस्ट २०२१ रोजी धायरी फाटा परिसरात त्रिमूर्ती रुग्णालयाजवळच्या व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये घडली होती. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी तक्रार दिली होती..याबाबत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तपास अधिकारी प्रतिभा तांदळे यांनी अजयला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले..India Oil Imports : कच्च्या तेलाच्या आयातीत वाढ; युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून खरेदी.खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासले. त्यामध्ये चार साक्षीदारांसह तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सायबर तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.