esakal | धक्कादायक : नवरा- बायकोच्या भांडणात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

नवरा-बायकोची भांडणे टोकाला गेल्यामुळे खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या तीन प्रकरणांमध्ये चार जणांचे बळी गेल्याच्या घटना रविवारी दिवसभरात घडल्या. राजगुरुनगर बस स्थानकाच्या शेजारील आनंदनगर वसाहतीमध्ये पतीशी भांडण झाल्याच्या कारणावरून पत्नीने दीड वर्षाच्या मुलीचा गळा घोटून स्वतः आत्महत्या केली.

धक्कादायक : नवरा- बायकोच्या भांडणात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा बळी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर (पुणे) : नवरा-बायकोची भांडणे टोकाला गेल्यामुळे खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या तीन प्रकरणांमध्ये चार जणांचे बळी गेल्याच्या घटना रविवारी दिवसभरात घडल्या. राजगुरुनगर बस स्थानकाच्या शेजारील आनंदनगर वसाहतीमध्ये पतीशी भांडण झाल्याच्या कारणावरून पत्नीने दीड वर्षाच्या मुलीचा गळा घोटून स्वतः आत्महत्या केली. तर गोसासी याठिकाणी पत्नीशी झाल्याने पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेमध्ये मजूर पती पत्नीचे भांडण झाले आणि संध्याकाळी पत्नी संशयितरीत्या बेशुद्धावस्थेत आढळली आणि नंतर मृत घोषित झाली. 
योगिता अमित बागल (वय 32) व काव्या अमित बागल (वय दीड वर्ष, दोघीही रा. आनंदनगर, राजगुरुनगर, ता. खेड; मूळ रा. पेठ, ता. आंबेगाव); चेतन लहू रोडे (वय 30, रा. गोसासी, मूळ रा. वरची भांबुरेवाडी, ता. खेड); पूजा पप्पू चौहान (वय 20, रा. वाळुंजस्थळ, राजगुरुनगर, मूळ रा. काशेडी, रामपूर, जि. बदनापूर, उत्तरप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. 

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

राजगुरुनगर बस स्थानकाच्या जवळील आनंदनगर भागातील हरिहरेश्वर अपार्टमेंटमध्ये अमित बागल हे पत्नी योगिता आणि आणि मुलगी काव्या हिच्यासह राहत होते. त्यांची नोकरी गेली होती. त्यामुळे पती-पत्नीत भांडणे होत होती. अमित मूळ गावी पेठ येथे राहू असे म्हणत होता, तर पत्नी योगिता राजगुरुनगर राहण्यासाठीच हट्ट धरत होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी त्यांचे भांडण झाले व अमित पेठ येथे निघून गेला. शनिवारी रात्री परत आला पण पत्नी योगिताने त्याला घरात घेतले नाही. तो सकाळपर्यंत बाहेरच बसून होता. दुपारी घरातून काहीच आवाज येईना, म्हणून त्याने घरमालक व आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर पोलिसांना कळविले व दार उघडले. घरात गेल्यावर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे व तत्पूर्वी मुलीचाही गळा घोटल्याचे निष्पन्न झाले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दुसऱ्या घटनेत मूळ राजगुरुनगरजवळच्या वरची भांबुरेवाडी, येथील रहिवासी असलेल्या, पण सध्या गोसासी येथे मामाकडे राहून शेती करणाऱ्या, चेतन रोडे याने पत्नीशी झालेल्या भांडणातून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी रस्त्यालगत वाळुंजस्थळ येथे उत्तर प्रदेशातून मजुरी करण्यासाठी आलेल्या दांपत्यामध्ये भांडण झाले. दुपारी पती पप्पू चव्हाण घरी येऊन गेला. संध्याकाळी तो कामावरून घरी आल्यावर, पत्नी पूजा बेशुद्धावस्थेत आढळली. ते पाहून तोही बेशुद्ध पडला. शेजाऱ्यांनी पूजाला दवाखान्यात नेले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.  

loading image
go to top