esakal | विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!
sakal

बोलून बातमी शोधा

Students_Exam

पुणे विद्यापीठातर्फे पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या सुमारे 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 12 ऑक्‍टोबरपासून या परीक्षांना सुरूवात होणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही परीक्षा एकाच वेळी होणार आहेत.

पुणे विद्यापीठातर्फे पुणे, नगर आणि नाशिक या जिल्ह्यांमधील अंतिम वर्षाच्या सुमारे 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यापैकी 1 लाख 93 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, तर 40 हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाइनचा पर्याय निवडला आहे. तर उर्वरित सुमारे 17 हजार जणांनी कोणताही पर्याय निवडलेला नाही.

खासदार डॉ. कोल्हेंनी दिला कानमंत्र; 'कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नका!'​

ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 114 परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. विद्यापीठातर्फे शुक्रवारी जवळपास सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले असून, बीएससीच्या काही अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करणे बाकी आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातून प्रवेश पत्र (हॉल तिकीट) मिळणार आहे, असे विद्यापीठाद्वारे कळविण्यात आले आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने एजन्सी निश्‍चित केली असून या एजन्सीकडून विद्यापीठात स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी तीन दिवस ऑनलाइन परीक्षेचा सराव करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top