Pune News : पती-पत्नीचे नाते संपुष्टात; मात्र आई-बाबा म्हणून एकत्रच, दहा वर्षांच्या मुलीसाठी पालकांनी तयार केला ‘पॅरेंटिंग प्लॅन’

वैचारिक मतभेदांमुळे पती-पत्नी म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मुलीच्या भवितव्याची जबाबदारी मात्र दोघांनीही समानपणे स्वीकारली.
Court

Court

sakal

Updated on: 

पुणे - वैचारिक मतभेदांमुळे पती-पत्नी म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मुलीच्या भवितव्याची जबाबदारी मात्र दोघांनीही समानपणे स्वीकारली. दहा वर्षांच्या मुलीच्या शिक्षणापासून संगोपनापर्यंत आणि भविष्यातील सुरक्षिततेपासून सुट्ट्या-सणांच्या नियोजनापर्यंत प्रत्येक बाबीचा विचार करून आयटी क्षेत्रातील दाम्पत्याने घटस्फोटासोबतच ‘पॅरेंटिंग प्लॅन’ तयार केला. हा आराखडा घटस्फोटाच्या दाव्यासोबत न्यायालयात सादर करण्यात आला.

Loading content, please wait...