अंगात येणाऱ्या सासूच्या सांगण्यावरून पतीकडून पत्नीचा छळ

पतीसह सासू-सासऱ्यांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
pune
punesakal
Updated on: 

पुणे : अंगात येणाऱ्या सासूच्या सांगण्यावरुन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासरच्या मंडळींनी तिचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना हवेली तालुक्‍यातील केसनंद येथे घडली. याप्रकरणी पती, सासू-सासऱ्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

पती अजिंक्‍य जाधव, सासरे अशोक जाधव, सासू शितल जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ व जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2020 ते जुलै 2021 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे अजिंक्‍य समवेत विवाह झाल्यानंतर ते केसनंद येथे राहात होते. सुरवातीला त्यांनी फिर्यादीस माहेरून पैसे आणावेत, यासाठी त्रास देण्यास सुरूवात केली.

pune
राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

दरम्यान, फिर्यादीच्या सासूच्या अंगात येते. तिच्या सांगण्यावरुन त्यांनी फिर्यादी त्रास देण्यास सुरूवात केली. तसेच, ते तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारिरीक व मानसिक त्रास देत होते. तसेच सासरच्यांनी पतीच्या शारिरीक समस्याही लपवून ठेवल्याचे फिर्यादीने त्यांच्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Aspirants Continue Their Protest in Pune While Demanding an Inquiry Into the Commission Chairman
Patient Reportedly Falls from Moving Ambulance at YCM Hospital
MPSC Student Agitation
A lump of ice weighing over 15 kg fell from the sky into a farm.
Marathi News Esakal
www.esakal.com