पुण्याहून हैदराबाद, बेंगळुरूसह प्रयागराजसाठीही रोज फ्लाइट्स

टीम ई-सकाळ
मंगळवार, 28 जानेवारी 2020

प्रयागराजच्या विमानसेवेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना प्रयागराजला जाण्यासाठी थेट विमान मिळणार आहे.

पुणे : हैदराबाद आणि बंगळूरूसाठी आणखी दोन विमान कंपन्यांनी रोज विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, प्रयागराजसाठीही शहरातून पहिल्यांदाच विमानसेवा उपलब्ध होणार आहे. तिन्ही मार्गांवर आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा सुरू राहणार आहे. प्रयागराजच्या विमानसेवेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना प्रयागराजला जाण्यासाठी थेट विमान मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"गो एअर'कडून हैदराबासाठी विमानसेवा 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हे विमान हैदराबादहून सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी निघणार असून दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी पुण्यात पोचेल. दुपारी एक वाजता पुण्यातून निघून ते दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी हैदराबादला पोचेल. तर, "एअर एशिया'चे बंगळुरूसाठीचे विमान 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी ते बंगळुरूमधून निघणार असून सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी ते पुण्यात पोचेल. पुण्यातून सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी ते निघेल आणि सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी बंगळुरूला पोचेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"इंडिगो'चे प्रयागराजसाठीचे विमान 5 मार्चपासून सुरू होणार आहे. सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी ते निघेल आणि सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी ते पुण्यात पोचेल. पुण्यातून ते 12 वाजून 20 मिनिटांनी ते निघेल आणि दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी ते प्रयागराजला पोचेल, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabad bangalore prayagraj flights to start from pune