मी मावळ मध्ये जनरल डायर सारखा लढलो - विजय शिवतारे

पुरंदरची खुमखुमी मी पुणे महानगरपालिका निवडणुकीत काढणार
विजय शिवतारे
विजय शिवतारे

पुणे : मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी जनरल डायरसारखा लढलो ,आणि पार्थ पवार चा पराभव केला .मात्र मी विधानसभेला उभा होतो तेव्हा माझ्या मागे कोणी उभा राहील नसल्याची खंत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली आहे.पुण्यात खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना पुणे शहर व बारामती लोकसभा पदाधिकारी आढावा बैठकीत बोलताना त्याने व्यक्त केली आहे.

पुण्यात आज वडगाव शेरी या ठिकाणी पदाधिकारी आढावा बैठक झाली या बैठकीत खासदार संजय राऊत ,उपसभापती नीलम गोरे ,सचिन आहेर इतर पदाधिकारी उपस्थित होते .आगामी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवतारे यांनी त्याची नाराजी व्यक्त केली.

विजय शिवतारे
"घराघरांत शिवसेना का पोचली नाही?"

सर्व सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा बँक मध्ये स्थान मिळत नाही. मी पार्थ पवार विरोधात मावळ मध्ये प्रचार केला तर मला खुल आव्हान देऊन पडलं असलं तरी मनपा निवडणूक मध्ये मी सर्व प्रयत्न करणार अस सांगत एक हाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुरंदरची खुमखुमी मी पालिकेत दाखवून देऊ इच्छितो अस म्हणत थेट त्यांनी पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच राष्ट्रवादीच नाव न इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com