I usually stay away from digital media Twitter Dr Nitin Karmalkar pune
I usually stay away from digital media Twitter Dr Nitin Karmalkar pune sakal

...म्हणून ट्वीटरपासून लांब; डॉ. नितीन करमळकर

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केला खुलासा
Published on

पुणे : डिजीटल माध्यमांपासून मी सहसा लांबच असतो विद्यापीठाचे कुलगुरू ट्विटर सारख्या समाजमाध्यमावर असायला हवेत, असे लोक म्हणतात. पण जेव्हा मी ट्विटर वापरेन, तेंव्हा त्यावर येणाऱ्या प्रत्येक ‘प्रतिक्रिये’ला प्रतिसाद देणे ही माझी जबाबदारी आहे. आणि कुलगुरू म्हणून मी हे दिवसभर करू शकत नाही. यामुळे अशा माध्यमांपासून मी लांब राहतो,’ असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात आयोजित ‘फंडामेंटल्स ऑफ डिजीटल जर्नलिजम’ या पुस्तकाचे डॉ. करमळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन विश्वकर्मा प्रकाशन तर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर, डॉ. योगेश जोशी आणि डॉ. मकरंद पंडित, डॉ. संजय तांबट आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार असल्याने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

विद्यापीठाचे १३० सामंजस्य करार

‘शिक्षणपद्धतीमध्ये तातडीने बदल करण्याची गरज असून चॉइस बेस्ड क्रेडीट पद्धती आणि लिबरल शिक्षण यावर शिक्षण पद्धती अवलंबून असायला हवी. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये यावरच भर देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मी सातत्याने नवीन शिक्षणपद्धती अवलंबण्याचा प्रयत्न केला. उद्योग, संस्था यांना विद्यापीठाशी जोडण्यासाठी जवळपास १३० हून अधिक सामंजस्य करार केले. यामुळे विद्यापीठाच्या बाहेर काय घडते आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल’, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. विद्यापीठामध्ये काही विभागांमध्ये परस्पर संवादाचा अभाव आहे. काही ठिकाणी तर एकाच विभागात संवाद होताना दिसत नाही. हा विसंवाद टळला तर येणाऱ्या काळात विद्यापीठात खऱ्या अर्थाने लिबरल शिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com