esakal | ई पीक पाहणीत देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम करायचेय : बाळासाहेब थोरात
sakal

बोलून बातमी शोधा

ई पीक

"ई पीक पाहणीत देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम करायचेय"

sakal_logo
By
योगेश कामथे ः सकाळ वृत्तसेवा

खळद : महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतशील शेतकरी असून तो कधीही अडचणी सांगत नाही,अडचणी आल्या तर त्यावर तो मात करतो ही आपली ओळख असून ई पीक पाहणी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी केली पाहिजे ,तक्रारी सांगण्याचे कारण नाही,अडचणी आल्या तर विचारा पण हा ई पीक पाहणीचा उपक्रम ही नव्या युगाची सुरुवात असून संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम आपणाला करायचे असल्याचे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

खळद(ता.पुरंदर) येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मोफत सुधारित सातबारा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी राजेश देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी विजय देशमुख, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप,उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत,जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, पाणी पंचायतीच्या कल्पना ताई साळुंखे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते,सरपंच कैलास कामथे बाळासाहेब कामथे,योगेश कामथे, मंडलाधिकारी प्रभावती कोरे,तलाठी सोमशंकर बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: ZEE5 Global वर रंजक मराठी मालिका, चित्रपट आणि ओरिजनल्सची मेजवानी

यावेळी मुक्ताबाई शिवाजी खळदकर,रामदास विष्णू कामथे, मधुकर बापुराव रासकर, सुनिता गंगाराम कादबाने, दशरथ शिवराम कादबाने यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुधारित सातबाराचे वाटप करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना थोरात म्हणाले की मी यापूर्वीही महसूल विभाग सांभाळला असून नागरिकांची कामे सहजतेने,बिनचूक व पारदर्शकतेने व्हावीत यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत असून आता सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध केला आहे. तर सातबारावरील पोटखराबा शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार कमी करण्याची सुविधाही उपलब्ध असून एकाच वेळेस सातबारा बरोबर फेरफार मिळण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर हे करत असताना तलाठी भाऊसाहेबांचा मान सन्मान कमी न करता त्यांचा त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून एका सजामध्ये ४ते ५ गावे असून त्यांना पीक नोंदणीसाठी कष्ट करावे लागत होते. यासाठी हा उपक्रम सर्वात प्रथम मी माझ्या तालुक्यात राबवला व नंतर राज्यात राबविला यामुळे याचा आता सर्वांना फायदा होणार आहे. तर कृषी विभागालाही याचा फायदा होईल या माध्यमातूनही पीक निहाय क्षेत्र एका क्लिक वरती समजणार आहे, कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर अनुदान देते वेळेस पंचनाम्यासाठी दिरंगाई होणार नाही व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.

ई पीक पाहणी अतिशय प्रभावशाली योजना असून सर्वसामान्य लोकांना शासकीय यंत्रणेत हेलपाटे मारणे आता थांबणार असून त्यांना यापुढे कोणतीही अडचण न येता सर्व माहिती सहज उपलब्ध होणार असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले.

"पुरंदर तालुक्याचे आपले जवळचे नाते असून पूर्वीचा तालुका व आताचा तालुका यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून शेती क्षेत्रात तालुक्यात मोठा बदल होत आहे. स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या विकासाचा वारसा घेऊन आमदार संजय जगताप वाटचाल करीत असताना पुरंदरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याची ग्वाही मंत्री बाळासाहेब थोरात व विश्वजीत कदम यांनी यावेळी दिली.'' कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन महेश राऊत यांनी केले व आभार उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी मानले.

loading image
go to top