IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

IAS Tukaram Mundhe: वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई यांचं आज पुण्यात निधन झालं. तुकाराम मुंढे कामानिमित्त पश्चिम बंगालमध्ये असून ते पुण्याला येण्यासाठी निघाले आहेत.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe Mother Dies Funeral in Beed

Esakal

Updated on

IAS Tukaram Mundhe: आयएएस तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. तुकारम मुंढे यांच्या आईचं वय ९० पेक्षा जास्त होतं. वार्धक्यानं त्यांचं निधन झालं असल्याची माहिती समोर येत आहे. आसराबाई यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर बीडमध्ये मूळगावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. IAS Tukaram Mundhe Mother Passes Away in Pune

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com