‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी समीर लड्डा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए समीर लड्डा, तर उपाध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे यांची निवड झाली. २०२१-२०२२ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. लड्डा यांनी मावळते अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

पुणे - दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए समीर लड्डा, तर उपाध्यक्षपदी सीए काशिनाथ पठारे यांची निवड झाली. २०२१-२०२२ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. लड्डा यांनी मावळते अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए ऋता चितळे उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लड्डा व पठारे यांचे अभिनंदन करण्यात आले. ‘आयसीएआय’ पुणे शाखेची सुरवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे १०,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २२००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते.

मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल

सीए समीर लड्डा म्हणाले, ‘मागील तीन वर्षांमध्ये पुणे शाखेला मेगा श्रेणीमध्ये १२ पारितोषिके मिळाली. हे काम असेच पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील. मागील वर्षी ‘३आय’ इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा), इमेज (प्रतिमा), इंन्टलेक्च्युअल (बौद्धिकता) यावर काम केले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICAI Pune Chairman Samir Ladda