

Sakal
मांजरी : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाचा (आईसीएआर–डीएफआर) १६ व्या स्थापना दिवसानिमित्त बुधवारी (ता. १०) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी संबंधित क्षेत्रातील पाहुणे, शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी सहभागी होणार आहेत. संस्थेचा हा स्थापना दिवस संशोधक, धोरणकर्ते, उद्योग व शेतकरी या सर्वांसाठी संवाद आणि सहकार्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग होणार आहेत.