Goodluck Cafe
Goodluck Cafesakal

Goodluck Cafe: काचेचे तुकडे सापडल्याच्या प्रकरणानंतर १२ दिवसांनी ‘कॅफे गुडलक’ पुन्हा सुरू

Pune Food News: कॅफे गुडलकच्या बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याने एफडीएने परवाना निलंबित केला होता. स्वच्छतेतील त्रुटी दूर करून १२ दिवसांनी हे प्रतिष्ठान पुन्हा सुरू झाले आहे.
Published on

पुणे : बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याप्रकरणी अन्‍न व औषध प्रशासनाने (एफडीए) परवाना तात्‍पुरता निलंबित केल्‍यावर पुण्यातील तब्‍बल ९० वर्षांची परंपरा खाद्यसंस्‍कृतीची परंपरा असलेले कॅफे गुडलक हे उपाहारगृह अखेर पुन्‍हा एकदा १२ दिवसांनी सूरू झाले.

या उपहारगृहाने सर्व त्रुटींची पुर्तता केल्‍यानंतर त्‍यांना ‘एफडीए’ ने परवानगी दिली.
नामदार गोपाळकृष्‍ण रस्‍त्‍यावरील ‘कॅफे गुडलक’ च्‍या बन मस्‍कामध्‍ये काचेचे तुकडे आढळल्‍याचा एक व्हिडिओ ग्राहकाने समाजमाध्‍यमावर टाकला होता.

त्‍यावरून ‘एफडीए’ ने दखल घेत तेथे भेट दिली असता त्‍यांना गुडलकमध्‍ये इतर असुविधा आढळल्‍या. यामध्‍ये स्‍वच्‍छता नसणे, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, स्‍वयंपाकगृहाच्‍या भिंती काळ्या झालेल्‍या अवस्थेत होत्या.

हे सर्व आढळून आले होते. त्‍याचबरोबर अन्‍नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. जोपर्यंत या सर्व बाबींची पुर्तता होत नाही तोपर्यंत या उपहारगृहाचा परवाना ‘एफडीए’चे सहआयुक्‍त सुरेश अन्‍नपुरे (अन्‍न विभाग) १४ जुलै रोजी निलंबित केला होता.

Goodluck Cafe
Nag Panchami 2025: ग्रामीण भागातच नागपंचमीचा उत्साह; अभ्यासक सांगतात जुन्या धारणा अन् परंपरांचा पगडा

कॅफे गुडलक ने ‘एफडीए’ च्‍या सर्व नियमांची पुर्तता केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍याकडे काम करणाऱ्या कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्‍यांनी सादर केले. तसेच स्‍वयंपाकगृहातील भिंती स्‍वच्‍छ करून रंग दिला. सर्व नियमांची पुर्तता केल्‍याने त्‍यांना शुक्रवारपासून (ता. २५) उपाहारगृह चालविण्‍याची परवानगी दिली आहे. दरम्‍यान लष्‍कर परिसरातील ‘भिवंडी दरबार’ या हॉटेलने अद्याप योग्‍य त्‍या बाबींची पुर्तता न केल्‍याने त्‍यांचा परवाना अद्याप निलंबित आहे.
- सुरेश अन्‍नपुरे, सहआयुक्‍त, ‘एफडीए’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com