Nag Panchami 2025: ग्रामीण भागातच नागपंचमीचा उत्साह; अभ्यासक सांगतात जुन्या धारणा अन् परंपरांचा पगडा
Shravan Festival: श्रावणातील पहिला सण असलेले नागपंचमीचे पारंपरिक स्वरूप अजूनही ग्रामीण भागात टिकून आहे. मात्र सण साजरा करताना अंधश्रद्धा टाळून पर्यावरणपूरक व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे.
नागपूर: श्रावणातील पहिला सण असलेले नागपंचमीचे पर्व ग्रामीण भागात पारंपरिक उत्साहात साजरे केले जाते. शहरी भागात मात्र हा जोश कमी झाला आहे. या सणाशी संबंधित अनेक परंपरा आजही पाळल्या जातात.