महत्वाची बातमी : आयसीएसई आणि आयएससीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

-आयसीएसई आणि आयएससीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
- १ ते १४ जुलै दरम्यान होणार परीक्षा

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(सीबीएसई) पाठोपाठ आता कौन्सिंल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) यांच्या वतीने आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी)च्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता उर्वरित पेपर १ ते १४ जुलै दरम्यान होणार आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नियमित वेळापत्रकानुसार होणाऱ्या या परीक्षा काही दिवसांपूर्वी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता 'सीआयएससीई'ने दहावी आणि बारावीच्या उर्वरित पेपरचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी संकेतस्थळाद्वारे जाहीर केले. आयसीएसई म्हणजेच दहावीची उर्वरित विषयांची परीक्षा २ ते १२ जुलै २०२० या कालावधीत घेण्यात येणार आहे.

आयएससी म्हणजे बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा १ जुलै ते १४ जुलै २०२० या दरम्यान घेतली जाणार आहे. बारावीच्या जीवशास्र, बिझनेस स्टडीज, भूगोल, मानसशास्त्र, समाजशास्त्र, होम सायन्स (पेपर एक- लेखी पेपर), इलेक्टिव इंग्लिश आणि आर्ट फाइव-क्राफ्ट  या आठ विषयांची परीक्षा शिल्लक होती. 
तर दहावीची हिंदी, भूगोल, बायोलॉजी (सायन्स पेपर ३), आर्ट पेपर ४ (एप्लाइड आर्ट), अर्थशास्त्र ( ग्रुप २ इलेक्टिव) यांसह ग्रुप ३ इलेक्टिवमधील पेपर अशा विषयांची परीक्षा शिल्लक होती. या दोन्ही इयत्तांच्या परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हे नियम पाळणे राहिल बंधनकारक.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयसीएसई बोर्डाने जाहीर केलेली नियमावली - सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक
- प्रवेशद्वार ते परीक्षा खोली अशा सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे लागणार
-विद्यार्थ्यांनी मास्क लावणे बंधनकारक
- विद्यार्थ्यांनी स्वत:चे हॅण्ड सॅनिटायझर सोबत आणावे आणि त्याचा वापर करावा. ग्लोव्ह्जचा पर्याय वापरु शकतात.
- अॅडमिट कार्ड परीक्षा केंद्रावर असणे बंधनकारक आहे.
...
*परीक्षेच्या सुधारित वेळापत्रकासह सविस्तर तपशील पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी "https://www.cisce.org" या संकेतस्थळाला भेट द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICSE and ISC's remaining examination schedules announced