मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा

संदिप जगदाळे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

हडपसर (पुणे) : आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यामुळे त्यांच्यात शारिरीक व मानसिक विकार जडतात. त्यामुळे "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा " हा नावीन्यपूर्ण उपक्रम मानवी युवा विकास संस्थेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने रामटेकडी मधील लहान मुलांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मोबाईचा अतिवापर टाळण्याबाबत मुलांना अवाहन करण्यात आले व मैदानी खेळाचे शाररीक व मानसिक विकासातील महत्त्व पटवून देण्यात आले. 

डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे मानवी युवा विकास संस्थेच्या वतीने "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा" या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक अशोक कांबळे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक रुपेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक तानाजी देशमुख, प्रविण चॅरिटेबल संस्थेचे क्रीडा समनव्यक तुषार बिनवडे, विलास जाधव, बळीराम गायकवाड, आयोजक मानवी संस्थेचे अध्यक्ष डी. जे. माने, उपाध्यक्ष अॅड. विजय डावरे, सचिव प्रा. फ्रँकलिन साळवी,सचिन जाधव, सुनिल ससाणे, संतोष ससाणे आदी उपस्थित होते.

यावेळी रामटेकडी व वैदूवाडी परिसरातील मुलांचे तीन ग्रुप तयार करण्यात आले. प्रत्येक ग्रुपला क्रिकेट साहित्य, हॅन्ड बॉल, फूड बॉल, डॉज बॉल, हॉलीबॉल, दोरी वरील उड्या, लंगोरी, रिंगा आदी क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. मुलांनी रोज खेळ खेळावा व त्यानंतर हे साहित्य ग्रुप प्रमुखाकडे जमा करणे असे नियोजन केले आहे. त्याच बरोबर मानवी संस्थेकडून विविध खेळांचे प्रशिक्षण या भागातील मुलांना मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी मुलांचा आवडता खेळ व त्यातील त्याचे प्राविण्य लक्षात घेतले जाणार आहे. 

यावेळी रुपेश मोरे म्हणाले, मुलांनी खेळ खेळाला पाहिजे. आजची मुले मोबाईलच्या आहारी गेलेले दिसून येत आहेत. मुलांनी खेळ खेळल्यास त्याचे आरोग्य व बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. पालिकेच्या वतीने मुलांच्या खेळासाठी मैदान, खेळाचे साहित्य व क्रीडा मार्गदर्शक दिल्यास वंचित व गरजू मुले खेळापासून वंचित राहणार नाहीत. 

मानवी संस्थेचे उपाध्यक्ष डावरे म्हणाले, मानवी संस्था मागील दहा वर्षापसून झोपडपट्टीतील मुलांच्या शैक्षणिक, बेरोजगारी व क्रीडा विकासासाठी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे. समाजात आजचा युवकाला मोबाईलचे व्यसन लागले आहे. ते कमी करण्यासाठी मैदानी खेळ हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे संस्थेने "मोबाईल टाळा मैदानी खेळ खेळा" हा उपक्रम सुरु केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ignore mobile and play physical games on ground