

Indian Scientists at IISER Pune Develop Indigenous 25 Q-Bits
Sakal
पुणे : क्वांटम संगणकासाठी आवश्यक ‘क्यू-बीट्स’ विकसित करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘ट्रॅप्ड आयन्स’ या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रथमच पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांनी स्वदेशी २५ क्यू-बीट्स तयार केले आहेत. यामुळे आता क्वांटम गेट्स आणि संगणक विकसित करता येईल.