Pune IISER Students Protest: ‘आयसर’मध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन कायम; ४८ तासांनंतरही मागण्यांवर तोडगा नाही

आयसरमध्ये विद्यार्थ्यांचा ठिय्या तिसऱ्या दिवशीही कायम; मानसिक आरोग्य सुविधा, जाचक नियम आणि राज बागवे यांच्या निलंबनासह पाच प्रमुख मागण्यांवर प्रशासनाशी संघर्ष
IISER

IISER students continue their protest over key demands.

Sakal

Updated on

पुणे : शैक्षणिक सुधारणा, मानसिक आरोग्य सुविधांचा अभाव आणि जाचक नियमांविरोधात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) विद्यार्थ्यांचा ठिय्या सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. संस्थेचे संचालक आणि अधिष्ठाता यांच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी सायंकाळपासून विद्यार्थी ठिय्या देऊन बसले आहेत. ‘आयसर’चे संचालक स्वतः मागण्या ऐकून घेत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com