

दोन हॉस्टेल मेसला व्यवसाय
बंद करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७: पवई येथील आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधील दोन हॉस्टेल मेस आवश्यक अन्न परवान्याशिवाय सुरू असल्याचे तपासणीत आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांना तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान करण्यात आली.
एफडीएला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर आयआयटी बॉम्बेतील तीन हॉस्टेल मेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये हॉस्टेल क्रमांक १ आणि हॉस्टेल क्रमांक ३ मधील मेसकडे अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत आवश्यक अन्न परवाना किंवा नोंदणी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही मेसना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. हॉस्टेल क्रमांक १२, १३ आणि १४ मधील अन्नपूर्णा केटरिंग सर्व्हिसेसकडे वैध परवाना असला तरी अन्न सुरक्षा नियमांतील त्रुटी आढळल्याने सुधारणा नोटीस देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.