‘आयएलसी-आय’च्या पुरस्कारांचे आज वितरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

दि इंटरनॅशनल लॉगेव्हेटी सेंटर-इंडियाच्या (आयएलसी-आय) वतीने देण्यात येणाऱ्या श्री. बी. जी. देशमुख पुरस्कार आणि अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराचे उद्या (शनिवार) वितरण होणार आहे. पौड रस्त्यावरील मोरे विद्यालय कॅम्पसमधील नवीन लॉ कॉलेजच्या सभागृहात संध्याकाळी पाचला हा सोहळा पार पडेल.

पुणे - दि इंटरनॅशनल लॉगेव्हेटी सेंटर-इंडियाच्या (आयएलसी-आय) वतीने देण्यात येणाऱ्या श्री. बी. जी. देशमुख पुरस्कार आणि अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराचे उद्या (शनिवार) वितरण होणार आहे. पौड रस्त्यावरील मोरे विद्यालय कॅम्पसमधील नवीन लॉ कॉलेजच्या सभागृहात संध्याकाळी पाचला हा सोहळा पार पडेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिलांच्या अधिकाराविषयी काम करणाऱ्या फ्लॅव्हिया ॲग्नेस यांना ‘अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार’, तर ‘श्री. बी. जी. देशमुख पुरस्कार’ तीन ज्येष्ठ नागरिक संघ आणि तीन ज्येष्ठांना अस्थिरोगतज्ज्ञ व पद्मविभूषण के. एच. संचेती यांच्या हस्ते दिला जाणार आहे. 

आधार ज्येष्ठ नागरिक संस्था (मिरज), ज्येष्ठ नागरिक संघ (धायरी) आणि कुआरबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ (रत्नागिरी) या ज्येष्ठ नागरिक संघांना आणि डॉ. नामदेव बेहरे, डॉ. प्रमोद मोघे आणि पांडुरंग बोराटे यांना बी. जी. देशमुख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींना पाच हजार रुपये आणि संघांना दहा हजार रुपये व चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम आणि आयएलसी-आयचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, जयंत उमराणीकर या वेळी प्रमुख पाहुणे असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ILC-I award distribution