esakal | Pune : एअरगन, पिस्तूल बाळगणाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

news gun firing

Pune : एअरगन, पिस्तूल बाळगणाऱ्यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बेकायदेशीररीत्या एअरगन आणि पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पिस्तूलांसह दोन काडतुसे जप्त केली आहेत. सौरभ रामचंद्र सोळसकर (वय २२, रा. बालाजीनगर), शुभम आबा कसबे (वय २१, रा. कात्रज) व दत्तात्रेय राजाराम पाटोळे (वय १९, रा. कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक अंकुश कर्चे व त्यांचे पथक सोमवारी रात्रगस्त घालत होते. पथक पहाटे कात्रज येथील नारायणी धाम मंदिर येथे आले असता त्यांना दुचाकीवर तिघेजण बसल्याचे दिसले.

हेही वाचा: 'नुसत्या घोषणा देऊन काही होत नाही,' मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली. तसेच, त्यांची झडती घेतली. त्यावेळी सोळसकरकडे एक पिस्तूल व दोन काडतुसे, कसबेकडे एक पिस्तूल व एक काडतूस आणि पाटोळे याच्याकडे काळ्या रंगाची एअरगन व राउंड मिळून आले. त्यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक संगीता यादव, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, रवींद्र चिप्पा, राजू वेगरे व तुळशीराम टेंभुर्णी यांच्या पथकाने केली आहे.

loading image
go to top