Pune Police : कात्रज घाट परिसरात तिघांकडून तीन पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या कॉप्स २४ पथकाची कारवाई
Illegal Weapons : कात्रज घाटात संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिघांकडून गावठी पिस्तुलं, मॅगझिन व काडतुसे असा तीन लाखांचा शस्त्रसाठा पुणे पोलिसांच्या तत्परतेने जप्त करण्यात आला.
पुणे : कात्रज घाट परिसरात तीन तरुणांकडून तीन गावठी बनावटीची पिस्तुले, दोन मॅगझिन आणि नऊ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या कॉप्स २४ पथकाने ही कारवाई केली.