राशीन-देवस्थानच्या जमिनीत बेकायदा बांधकाम..

राशीन-देवस्थानच्या जमिनीत बेकायदा बांधकाम..
Published on

RAS26A02340
अहिल्यानगर : अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना निवेदन देताना गुरव समाजाच्या महिला.

देवस्थानच्या जमिनीत
बेकायदा बांधकाम
राशीन, ता. ९ : येथील जगदंबा देवस्थानाच्या इनामी शेतजमिनीत न्यायालयाचा मनाई हुकूम असताना बेकायदा कुळ म्हणणाऱ्यांनी जबरदस्तीने पक्के बांधकाम करून पुजाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी पुजाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे. याप्रश्‍नी तातडीने कारवाईची मागणी केली.

जिल्हा अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे व अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, गट १४५८/१ व १४५८/२ ही इनाम वर्ग-३ची जमीन आहे. या जमिनीबाबत दावा न्यायालयात प्रलंबित आहे. संबंधित दाव्यात १३ जून २०१६ रोजी कर्जत दिवाणी न्यायालयाने प्रतिवादींना कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा खोदकाम करू नये, असा स्पष्ट मनाई हुकूम दिला होता. आदेश कायम असताना संबंधिताने जबरदस्तीने खड्डे खोदून कॉलमचे बांधकाम केले, असे निवेदनात म्हटले आहे.
पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळात भाजपच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. प्रतिभा रेणूकर, मिलिंद रेणुके, शिरीष रेणूकर, प्रकाश रेणूकर, विकास वाघमारे, दीपक क्षीरसागर, कुमुदिनी रेणूकर, सुनीता रेणूकर, सुषमा रेणूकर, मंजुश्री क्षीरसागर, रोहिणी रेणूकर, सपना रेणूकर, अर्चना रेणूकर आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com