esakal | वारजे : अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

 अनधिकृत बांधकाम

वारजे : अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वारजे : दांगट पाटील येथील अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विभाग कारवाईला आला. मात्र नागरिकांनी बैठोआंदोलन केल्याने तीन तास झाले कारवाईला आलेली वाहने व अधिकारी एकाच ठिकाणी बसून आहे.

कारवाई करायची असेल तर सगळीकडे करा. आमच्यावरच सारखी कारवाई का करता, आम्ही शेतकरी आहोत. इमारत पूर्ण झालेली आहे. नागरिक राहावयास आले आहे. आम्ही टॅक्स ही भरतो. मग आमच्यावर कारवाई का करता असा प्रश्न उपस्तित करून नागरिकांनी कारवाईच्या ठिकाणी जाणारा रस्ता अडवून बसले आहेत. आठ पोलिस स्टेशन मिळून जवळपास 170 पोलीस, महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्रीकांत वायदंडे व अधिकारी उपस्तित आहेत.

हेही वाचा: ...अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा थेट इशारा

सकाळी साडे दहा पासून या भागात मोठा पोलीस बंदोबस्त दिसून येत होता. कारवाई करण्यासाठी मोठी क्रेन व तीन जेसीबी व कट्टर आणले आहेत. मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कारवाई करू देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्याने कारवाईचे पथक रस्त्यावरच स्थान मारून उभे आहे. गेली दोन तास झाले स्थानिक नागरिक व पोलीस अधिकारी, व महापालिका पदाधिकाऱ्या मध्ये चर्चा सुरु आहे.

loading image
go to top