

Loni Kalbhor Tobacco Factory Exposed Police Seize Flavoured Tobacco and Equipment Worth 11 Point 16 Lakh
esakal
लोणी काळभोर: कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड वस्ती परिसरात सुरू असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू निर्मितीच्या अवैध कारखान्यावर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तयार तंबाखू, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, पॅकिंग मशीन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २६, रा. लोणी काळभोर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.