
पुणे : जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून गेल्या सहा महिन्यांपासून देण्यात आलेले वहिवाटीचे मोजणी नकाशे तातडीने रद्द करण्याचा आदेश भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक यांनी दिले आहेत. तसेच असे नकाशे रद्द करण्यात आले असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना कळवावे. येथून पुढे हद्द कायम करून देण्याबाबत आलेल्या अर्जावर मोजणी करून वहिवाटीचे मोजणी नकाशे दिल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही आदेशात दिला आहे.