
शिवाजीनगर : शहरातील मॉडेल कॉलनी या भागामध्ये दुचाकीवर दोन्ही बाजूंना मोठमोठ्या बॅगा लावून दूध बाटल्यांची अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. दूध वाहतूक करणारे हे दुचाकीस्वार वेगाने वाहने चालवत दूध वाहतूक करतात. दुचाकीला असणाऱ्या मोठ्या बॅगांमुळे रस्त्याने चालणाऱ्या इतर वाहनांना धक्का लागून इतर दुचाकी वाहनांचे अपघात होतात. त्यावर हे दुचाकीस्वार दूध विक्रेते शिरजोरी करत असून, या भागातील रहिवाशांना दमदाटी करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.