
सिंहगड रस्ता : कालवा रस्त्यावरील खोराड वस्ती रस्त्यावर अनधिकृत वाहनतळामुळे रस्ता अरुंद झाला असून, फलकबाजीमुळे रस्ता ओलांडणे नागरिकांना धोकादायक झाले आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह वाहनचालकांनी केली आहे.