मळदमध्ये भरदिवसा बेकायदा वाळू उपसा; प्रशासनाकडून केली जातेय लुटूपुटूची कारवाई

सावता नवले
Monday, 14 September 2020

मळद ( ता. दौंड ) येथील ओढयातून जेसीबीच्या सहायाने होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाविरूध्द महसूल विभागाने पंचनामा करण्याची लुटूपुटूची कारवाई करूनही वाळूमाफीयांना काहीही फरक पडला नसून पुन्हा दिवसाही खुलेआम वाळू उपसा चालू केला आहे.

कुरकुंभ (पुणे) : मळद ( ता. दौंड ) येथील ओढयातून जेसीबीच्या सहायाने होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाविरूध्द महसूल विभागाने पंचनामा करण्याची लुटूपुटूची कारवाई करूनही वाळूमाफीयांना काहीही फरक पडला नसून पुन्हा दिवसाही खुलेआम वाळू उपसा चालू केला आहे. वाळूमाफीया व उपशासाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करून  त्यांच्याविरूध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मळद येथील ओढा व बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातून खुलेआम जेसीबीच्या साहाय्याने रात्रंदिवस बेकायदेशीर वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे ओढ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीला धोका संभवतो. तर पूर आल्यास ओढयाचा प्रवाह बदलून शेतजमिन वाहून गेल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होऊ शकते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या बेकायदेशीर वाळू उपशासंदर्भात सकाळने वृत्त प्रसिध्द केल्याने महसूल विभागाला जाग आली. महसूल विभागाने ज्या चार शेतकऱ्यांच्या शेतातून बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे. त्याठिकाणच्या 98 ब्रास वाळू उपशाचा पंचनामा करून तहसीलदारांकडे अहवाल सादर केला असल्याची माहिती तलाठी दीपक पांढरपट्टे यांनी दिली.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

या वाळू उपशाचा पंचनामा होऊनही ठोस कारवाई न झाल्याने वाळूमाफीया पुन्हा खुलेआम रात्रंदिवस वाळू उपसा सुरू केला आहे. एका दिवसात दहा ट्रक म्हणजे जवळपास 50 ब्रास वाळू उपसा केला  जात आहे. यातून दररोज ऐंशी हजार ते एक लाखाची उलाढाल होत असल्याने वाळूमाफीया मालामाल झाले आहेत. महसूल विभाग व तक्रारदारांना हप्ते देऊन त्यांची तोंडे बंद केल्याने कारवाई होत नाही. त्यामुळे पिढीत शेतकरी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. यासंदर्भात महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छापा टाकून बेकायदेशीर वाळू उपसा करणारी वाहने जप्त करून वाळूमाफीया व वाहनांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sand extraction in malad