
खेड तालुक्यात चाकण नंतर महाळुंगे, वासुली फाटा या अल्पावधीत उदयास आलेली बाजारपेठ आहे. फोफावलेले अवैध धंदे, खंडणीखोरपणा आणि मुलांना भाईगिरीचे प्रचंड आकर्षण निर्माण झाल्याने गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. पोलिस मात्र या गंभीर प्रकाराकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत असल्याने एक प्रकारे त्यांचा या गोष्टीना अप्रत्यक्ष पाठींबा असल्याचे दिसत आहे.
आंबेठाण : चाकण एमआयडीसीत अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध देशी दारूची विक्री, बेकायदा गॅस भरून देण्याची दुकाने आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात बळावले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे चालकांचे कंबरडे मोडण्याची घोषणा केली होती. परंतु स्थानिक पोलिसांनी त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली असून एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरूच आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
खेड तालुक्यात चाकण नंतर महाळुंगे,वासुली फाटा या अल्पावधीत उदयास आलेली बाजारपेठ आहे. फोफावलेले अवैध धंदे, खंडणीखोरपणा आणि मुलांना भाईगिरीचे प्रचंड आकर्षण निर्माण झाल्याने गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. पोलिस मात्र या गंभीर प्रकाराकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत असल्याने एक प्रकारे त्यांचा या गोष्टीना अप्रत्यक्ष पाठींबा असल्याचे दिसत आहे.
बाजारपेठेच्या आजूबाजूला मटक्याचे विष पसरविले जात असून बेकायदा लॉटरी,काळे-पिवळे असे सामन्यांची लुट करण्यात येणारे धंदे जोमात सुरु आहेत.या परिसरात सध्या काही तरुण टोळक्याने राहून आपला दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यासाठी गुंड प्रवृत्तीचे राजकारणी आणि गुन्हेगारांचा आश्रय घेत आहे. हफ्ते वसुली, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री, रात्रीच्या वेळी कामगारांना लुटणे, लहानमोठ्या चोऱ्या करणे अशा अनेक घटना या भागात घडत आहे. एमआयडीसी भागात तर संध्याकाळ नंतर वाटसरूना लुटणे, मोबाईल हिसकावणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे.
आईच निघाली सव्वा महिन्याच्या मुलीची मारेकरी
अवैध धंदे बंद असल्याचा दिखावा करण्यात येत असला तरी अशा व्यावसायिकांनी छुप्या पद्धतीने त्यांचे व्यवसाय सुरू ठेवले आहेत.वासुली फाटा या वर्दळीच्या मुख्य चौकात तर खुलेआमपणे दारू विक्री सुरू आहे. याचा फटका महिला कामगारांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.तळीरामांच्या शेरेबाजीला सामोरे जात त्यांना मान खाली घालून जावे लागत आहे. असा भयानक प्रकार असला तरी सर्व काही आलबेल आहे असे दाखवून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एमआयडीसी भागात लहान व्यावसायिकांकडून हफ्ता वसूल केला जात आहे. काही दिवसांपूर्वी काही कारखानदारांना ठेक्यासाठी दमबाजी करण्याचा प्रकार घडला होता. कुठल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधीसुद्धा याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांमधील रोष वाढतच असल्याचे चित्र आहे. अवैध वाहतूक राजरोसपणे होत असून प्रशासन मात्र आर्थिक हितसंबंध जोपासण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे.
लाचखोर अधिकारी न्याय करतील ?
चाकण आणि म्हाळुगे पोलीस ठाण्याअंतर्गत वाढत्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती असतानाही स्थानिक प्रशासन त्याकडे जाणिवपूर्णक दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.नवीन चौकी झाल्यापासून आजवर म्हाळुंगे पोलिस चौकीतच जवळपास अर्धा डझन अधिकारी लाच घेताना सापडले असल्याने न्याय कुणाकडे मागावा? अशी परिस्थिती झाली आहे. कुंपणच शेत खात असल्याने आता वरिष्ठांनीच लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.