
IMA Protest
Sakal
पुणे : राज्य सरकारने आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नोंदवहीत करण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे या होमिओपॅथी डॉक्टरांना कायदेशीर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळेल. मात्र, त्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दंड थोपटले असून हा निर्णय रद्द करण्याचा अथवा १८ सप्टेंबर रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.