पुण्यात आठवडाभर चालणार पावसाची बॅटिंग; 'या' भागांना देण्यात आलाय दक्षतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

विशेष करून वरंधा घाट, सिंहगड, ताम्हिणी, वेल्हे, मुंबई-पुणे हायवे आदी ठिकाणी दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे : शहर आणि जिल्ह्यात पुढील आठवडाभर मध्यम ते तीव्र स्वरूपाचा, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. मागील चोवीस तासात शहरात 10 मिलिमीटर, तर लोहगाव येथे 9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवारच्या (ता.12) तुलनेत गुरुवारी चार मिलिमीटर जास्त पाऊस पडला. मॉन्सूनमध्ये आतापर्यंत पुण्यात एकूण 485 मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा 103.9 मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. शहरातील कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसच घट होत ते 25.3 अंश सेल्सिअस नोंदविले देले. पावसाचा अंदाज बघता पुणेकरांनी योग्य खबरदारी घेत घराबाहेर पडले पाहिजे. 

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा​

झाडे, जर्जर भिंत पडण्याची शक्‍यता :
मागील दोन दिवस झालेला पाऊस आणि आठवडाभराचा हवामानाचा अंदाज लक्षात घेता पुढील दोन दिवस डोंगराळ भागात दरड माती घसरण्याचे प्रकार तसेच झाडे आणि जर्जर झालेल्या भिंती पडण्यासारख्या घटना घडण्याची सर्वसाधारण शक्‍यता 'सतर्क' संकेतस्थळाने दिला आहे. संबंधित भागातील रहिवाश्‍यांसह प्रवाशांनीही विशेष काळजी घ्यावी. विशेष करून वरंधा घाट, सिंहगड, ताम्हिणी, वेल्हे, मुंबई-पुणे हायवे आदी ठिकाणी दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IMD Pune has warned of moderate to heavy rains in Pune city and district for next week