esakal | पुण्यात पावसाची जोरदार हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि परिसरात शनिवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. तर शहरात रात्री साठेआठ वाजेपर्यंत ३.९ मिलिमीटर तर लोहगाव येथे ६.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. तर पुढील काही दिवस शहरात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. पुण्याला पुढील दोन दिवस पावसाचा ‘येलो’ तर ७ ते ८ सप्टेंबरला ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच पुढील दोन दिवसानंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 मागील काही आठवड्यापासून शहरात पावसाने ओढ दिली होती. मात्र मागील काही दिवसांपासून शहर आणि परिसरात दिवसभरात पावसाची एखादी श्रावण सर हजेरी लावत आहे. हे चित्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून असेच कायम आहे. शहरात सध्या ऊन सावलीचा खेळ कायम आहे. शुक्रवारी (ता. ३) सायंकाळनंतर शहरातील विविध ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. शनिवारी सुद्धा अशीच स्थिती होती. शनिवारी सकाळपासूनच उनाचे सावट कायम होते, तर तुरळक ठिकाणी पावसाची एखादी श्रावण सर बरसली होती. मात्र रात्री आठनंतर शहरासह उपनगरात पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १०) शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवार (ता. ६) ते बुधवारी (ता. ८) जिल्ह्यातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यलो अलर्ट : जोरदार पावसामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी ‘येलो’ अलर्ट दिला जातो.

ऑरेंज अलर्ट : मुसळधार पावसामुळे येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो.

loading image
go to top