Chandrakant Patil : सूसमधील घनकचरा प्रकल्प तातडीने बंद करा

सूस येथील घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबतच्या तक्रारींवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला सज्जड दम भरला.
chandrakant patil Immediate Closure of the Solid Waste Project in Sus Demanded
chandrakant patil Immediate Closure of the Solid Waste Project in Sus Demandedsakal
Updated on

पुणे - सूस येथील घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबतच्या तक्रारींवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाला सज्जड दम भरला. 'सूस येथील घनकचरा प्रकल्प आजच बंद करा, अन्यथा या प्रकल्पाविरुद्ध खुर्ची टाकून बसावं लागेल,' असा इशारा पाटील यांनी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. प्रकल्प बंद केल्यास तेथे येणारा कचरा जिरवायचा कुठे? असा प्रश्‍न महापालिकेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सूस येथील घनकचरा प्रकल्पामध्ये दररोज १५० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. संबंधित प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मागील दोन वर्षांपासून नागरिकांकडून हा प्रकल्प अन्यत्र हटविण्याची आग्रही मागणी केली जात होती.

दरम्यान, हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करून तो नांदे-चांदे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जानेवारी २०२४ मध्ये झाला होता. त्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत पाटील यांनी संबंधित कचरा प्रकल्प तातडीने बंद करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या.

त्यावेळी, प्रकल्पाच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आले आहे. प्रकल्प स्थलांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा ताब्यात आली नाही, त्यामुळे स्थलांतर रखडले असून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून पाटील यांना सांगण्यात आले.

दरम्यान, हा प्रकल्प नियमांची पूर्तता करूनच सुरू केला असल्याने तो बंद करणे शक्‍य होणार नाही. प्रकल्प बंद केल्यास त्याचे मोठा भार महापालिकेवर पडणार आहे. प्रकल्पाबाबतच्या तक्रारी असतील, तर प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करण्याची विनंती पाटील यांना केली जाईल. त्यामध्ये सुधारणा करण्याची महापालिकेची तयारी असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com