बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी : फडवणीस

विजय मोरे 
Monday, 19 October 2020

"अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे." असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे केले.

उंडवडी :  "अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करणे गरजेचे आहे." असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बारामती तालुक्यातील शेती व पिक पाहणीचा दौरा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, सुनिल पोटे, माजी सरपंच एकनाथ जगताप, तुषार गवळी, संदीप गवळी, उध्दव गवळी, सुनील भोसले यांच्या ग्रामस्थ व कृषी अधिकारी उपस्थित होते. 

फडवणीस यांचा दौरा बारामती-पाटस रस्त्याने जाताना उंडवडी कप येथे थांबून शेतकऱ्यांची विचारपूस केली. उंडवडी सुपे येथील शेतकरी युवराज खंडेराव गवळी यांच्या बाधित शेताला भेट देवून शेतीची पाहणी केली. यावेळी ते सुरवातीला शेतकऱ्यांशी बोलले. त्यानंतर ते मिडियाच्या पत्रकारांशी बोलत होते. 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

फडवणीस पुढे म्हणाले, केंद्र सरकारने अतिवृष्टी झालेल्या गावांना भरघोस मदत करेलच परंतु तो राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. राज्यातील नेते मंडळी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी ही सगळी जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे सांगून शेतकऱ्यांना आपली झटकत आहे. परंतू पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची  असून भरीव मदत त्यांनी ताबडतोब जाहिर करणे गरजेचे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम्ही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात दौरे जाहीर करताच राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाणे शक्य नसले तर शेतकऱ्यांनी मोबाईल मधील काढलेला फोटो ग्राह्य धरुन प्रत्येकाला मदत करावी. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अतिवृष्टीमुळे शेतक-यांची जमीन खरडून वाहून गेल्याने सुपीक माती वाहून नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतक-यांना पुढील मशागतीसाठी चार हिश्यापैकी एक हिस्सा का होईना, मदत ताबडतोब राज्य सरकारने द्यावी." असेही फडवणीस यांनी बोलताना यावेळी नमूद केले. यानंतर फडवणीस यांच्या गाड्यांचा ताफा कुरकुंभकडे रवाना झाला. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediate help to farmers affected by heavy rains says devendra dadnavis