दुधेबावी : - फलटण तालुक्यात पाऊस लांबल्याने निर्माण झालेली टंचाईची परिस्थिती : आढावा

दुधेबावी : -  फलटण तालुक्यात पाऊस लांबल्याने निर्माण झालेली टंचाईची परिस्थिती : आढावा
Published on

बाजरी, मूग, उडीदसह
सोयाबीनवर परिणाम

फलटण : तालुक्यातील बहुतांश भाग हा अवर्षणप्रवण असल्याने पावसाअभावी पिण्याचे पाणी, शेती, चारा आणि ग्रामीण रोजगारावर परिणाम होऊ लागला आहे. फलटण तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून आहे. खरीप हंगामाची सुरुवात जून महिन्यात अपेक्षित असते. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या आहेत. बाजरी, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन यांसारख्या पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. पावसाचा विलंब वाढल्यास खरीप क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
................................

Marathi News Esakal
www.esakal.com