''कोरोना आजारातून बरे झालेल्यांसाठी समुपदेशन प्रकल्प राबवा'' : दिलीप वळसे-पाटील

डी.के वळसे-पाटील
Sunday, 25 October 2020

गेल्या पाच महिन्यापासून मजूर काम मागतात. काम मिळण्यासाठी त्यांना मोर्चा  काढावा लागला. ही बाब प्रशासनाला भूषणास्पद नाही. मनेरेगाची कामे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून द्या.अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे.” 
 

मंचर : “आंबेगाव तालुक्यात कोरोना साथ रोखण्यात प्रशासनाला चांगले यश आले आहे. एकूण तीन हजार ९५४ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. बरे झालेल्या तीन हजार ५२७ रुग्णांना घरी सोडले आहे, पण बहुसंख्य रुग्णांना आजारामुळे नैराश्य आले आहे. त्यांची चिडचिड वाढू लागली आहे. या रुग्णांना प्रेरणा, प्रोत्साहन व आनंद मिळण्यासाठी स्वयंसेवी संस्था व मानोसोपचार तज्ञामार्फत समोपदेशन करणारा पायलट प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.”, असे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(ता.आंबेगाव) येथे कोविड आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले ''मंचर व घोडेगाव येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड क्षमता व अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. मजुरांना मागणीनुसार मनेरेगाची कामे उपलब्ध करून द्या. गेल्या पाच महिन्यापासून मजूर काम मागतात. काम मिळण्यासाठी त्यांना मोर्चा  काढावा लागला. ही बाब प्रशासनाला भूषणास्पद नाही. मनेरेगाची कामे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून द्या.अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे.” 

“मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंबादास देवमाने,घोडेगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वणवे व डॉ.सीमा देशमुख यांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटली असून मृत्युदर कमी झाला आहे.” औषधांचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.

सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी
   
”सरकारी व खासगी अश्या नऊ  हॉस्पिटलमध्ये एकूण एक हजार १२१ बेड क्षमता आहे. त्यापैकी २१२ रुग्ण उपचार घेत आहेत. ९०९ बेड शिल्लक आहेत.”असे प्रांत सारंग कोडलकर यांनी सांगितले.

शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले “ कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रजा पिता ब्रम्हा कुमारी, आर्ट ऑफ लिविंग व स्वयंसेवी संस्थांमार्फत ध्यानधारणा ,योगासने व तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गादर्शन केले जाईल.” 

दसरा स्पेशल : छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीची दररोज होणार देखभाल!​

“आंबेगाव तालुक्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे ८६ गावातील  आठ हजार १७१ शेतकऱ्यांचे तीन हजार ९२ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाल्याचे पंचनामे पूर्ण झाले आहे.पूर्व भागातील नुकसान पंचनामे प्रक्रिया सुरु आहे.”असे तालुका कृषी अधिकारी टी.के चौधरी यांनी सांगितले.

यावेळी विवेक वळसे पाटील , संजय गवारी , संतोष भोर , अनिल  लाभते, रमा जोशी , जालिंदर पठारे, कृष्णदेव खराडे, प्रदीप पवार, योगेश महाजन, अजित शिंदे उपस्थित होते.

Maratha Reservation: तरुणांनी शरद पवारांना घातले साकडे; 'तमिळनाडू पॅटर्न'कडे वेधले लक्ष्य!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement counseling project for those who have recovered from corona disease said Dilip Walse-Patil