

Devotees Asked to Avoid Riverbed as Indrayani Water Level Rises in Alandi
esakal
आळंदी: इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील चार पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेतला असून सर्व भाविक, वारकरी आणि नागरिकांनी त्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.