esakal | इंदापुरातील लॉकडाउनबाबात तहसीलदारांचा महत्त्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

lock down

बारामती व तालुक्‍यातील भिगवण स्टेशन येथे 1 कोरोना रुग्ण सापडल्यामुळे आपण डेंजर झोनमध्ये आहोत.

इंदापुरातील लॉकडाउनबाबात तहसीलदारांचा महत्त्वाचा निर्णय

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरात सुदैवाने एकही कोरोना रुग्ण आढळला नसला, तरी शासन निर्णयाप्रमाणे इंदापुरात 17 मेपर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी संयमबाळगत शासकीय सूचनांचे पालन करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले. 

घराबाहेर पडू नका, या अॅपवर करा खरेदी

इंदापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार मेटकरी यांची भेट घेऊन शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते 2 या कालावधीत रोज किंवा एकदिवसाआड सुरू ठेवण्याची मागणी केली. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. 

या वेळी सोनाली मेटकरी म्हणाल्या, ""आपण पुणे जिल्ह्यात येत असून पुणे, बारामती व तालुक्‍यातील भिगवण स्टेशन येथे 1 कोरोना रुग्ण सापडल्यामुळे आपण डेंजर झोनमध्ये आहोत. काही ठिकाणी विलगीकरण झाल्यानंतर 20 व्या दिवशी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे संचारबंदी संपेपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी चांगले काम केले असून, शेवटच्या 10 दिवसांसाठी आपण सजग राहणे गरजेचे आहे.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, इंदापूर जैन सोशल क्‍लबचे संस्थापक नरेंद गांधी सराफ, नामदेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गानबोटे, संतोष भागवत, बंडू बोत्रे, संतोष ढोले आदींनी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. या वेळी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, मिलिंद दोशी, संजय जवंजाळ, पारसमल बागरेचा, इंदापूर रोटरी क्‍लब अध्यक्ष राकेश गानबोटे, श्रीनिवास बानकर, हरिदास गुजराती, राजेश जवंजाळ, भावेश ओसवाल आदी उपस्थित होते. 

दरम्यान, शासनाने दारू दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्यांना तातडीने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विठ्ठलराव ननवरे यांनी केली. तर व्यापारीसुद्धा जीएसटी भरतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना शासनाने सवलत द्यावी, अशी मागणी मुकुंद शहा यांनी केली. त्यावेळी बैठकीत हशा पिकला. 

loading image