पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दिली 'हि' महत्त्वाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य देत तब्बल 1 हजार 363 कोटी 42 लाख 65 हजार रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात यश आल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पुणे - जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य देत तब्बल 1 हजार 363 कोटी 42 लाख 65 हजार रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात यश आल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

देवकाते यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या शुक्रवारी (ता. 10) संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि मागील तीन वर्षांतील कामकाजाबाबत माहिती दिली. केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता नसतानाही जिल्हा परिषद निधी, जिल्हा नियोजन समितीसह केंद्र व राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करून निधी आणला आणि या निधीतून ही विकासकामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये निर्वाह भत्ता देणे, आदिवासी, दुर्गम आणि डोंगरी भागात विंधन विहिरींची खोदाई करण्यासाठी जिल्हा परिषद निधीतून छोटी रिंग मशिन खरेदी, विधवा, शेतकरी महिला, घटस्फोटित, परितक्ता व निराधार महिलांसाठी शारदा शेतकरी माता-भगिनी अर्थसाहाय्य योजना, दिव्यांगांना घरकुल उपलब्ध करून देणे, शाळा खोल्यांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे, शेतीविषयक योजनांच्या जनजागृतीसाठी ऍग्रो ऍम्बुलन्स सुरू करणे, जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी आर. आर. पाटील कॅन्सरमुक्त अभियान सुरू करणे आदी प्रमुख योजनांचा समावेश आहे. व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा तीन वर्षांत तब्बल 1 लाख 21 हजार व्यक्तींना लाभ दिला. तसेच 26 हजार 905 विकासकामे केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Video : पुण्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर कामगार संघटनाचा मोर्चा

विभागनिहाय प्रमुख कामांची संख्या 
- बांधकाम - 2 हजार 756 
- शिक्षण (प्राथमिक) - 1 हजार 719 
- महिला व बालकल्याण - 1 हजार 825 
- ग्रामपंचायत - 7 हजार 695 
- छोटे पाटबंधारे - 654 
- आरोग्य - 280 
- पशुसंवर्धन - 68 
- सामाजिक न्याय - 5 हजार 283 
- पाणीपुरवठा - 1 हजार 223 
- भूजल सर्वेक्षण - 1 हजार 388 
- कृषी - 3 हजार 953 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important information given by the President of Pune Zilla Parishad

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: