
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्यातील जवळपास ६४ हजार २५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र अद्यापही राज्यातील जवळपास ५० हजारांच्या आसपास जागा रिक्त आहेत. आता या प्रक्रियेतंर्गत प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर अखेरीस प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.
राज्यातील नऊ हजार ३३१ शाळांमधील जवळपास एक लाख १५ हजार ४६० जागांवरील प्रवेशासाठी सुमारे दोन लाख ९१ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील एक लाख ९२६ विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्रवेश देण्यात आला होता. त्यातील जवळपास ५८ हजार ४०७ विद्यार्थ्यांचे प्रोव्हिजनल प्रवेश घेतले आहेत. तर ६४ हजार २५५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत झालेले प्रवेश पोर्टलवर नोंदविण्याचे कामकाज अद्याप सुरू आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या उपलब्ध होण्यासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे कार्यालयीन कामकाज सध्या सुरू आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादितील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पावले उचलली जाणार आहेत. या यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळांबाहेर गर्दी करू नये. यासंदर्भात स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर देण्यात येणार आहे. साधारणत: प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सूचना दिल्या जातील, असेही टेमकर यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील ९७२ शाळांमधील १६ हजार ९४९ जागांवर आतापर्यंत १० हजार ४१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची (मंगळवारी सायंकाळपर्यंत) आकडेवारी :
-*जिल्हा : आरटीई शाळा : २५ टक्के राखीव जागा : आलेले अर्ज : पहिल्या सोडतीत निवडलेले अर्ज : प्रोव्हिजनल प्रवेश : निश्चित झालेल्या प्रवेशाची संख्या
- *पुणे : ९७२ : १६,९४९ : ६२,९१९ : १६,६१७ : १०,२०६ : १०,४१९
-*नाशिक : ४४७ : ५,५५७ : १७,६३० : ५, ३०७ : २,९९७ : ३,५१८
-*नागपुर : ६८० : ६,७८४ : ३१,०४४ : ६,६८५ : ४,७१४ : ३,९२२
-*ठाणे : ६६९ : १२,९२९ : २०,३४० : ९, ३२६ : ३,८७७ : ४,५८२
-* नगर : ३९६ : ३,५४१ : ७,०६५ : ३,३८२ : २,११३ : २,३३०
- *सातारा : २३६ : २,१३१ : ३,१०५ : १,८७५ :१,४७० : १,४४९
- *सोलापुर : ३२९ : २,७६४ :५,९८५ : २,३६२ : १,७९३ : १,७०९
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.