esakal | नीरा-भीमा नदीजाेड प्रकल्पाच्या बोगद्याबाबत महत्वाची बातमी 
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा-भीमा नदीजाेड प्रकल्पाच्या बोगद्याबाबत महत्वाची बातमी 

इंदापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या नीरा-भिमा नदी जोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून आत्तपर्यत बोगद्याचे निम्यापेक्षा जास्त काम १३.०७२ कि.मी पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन ठिकाणी बोगदे एकमेकांना जोडण्यामध्ये यश आले आहे.

नीरा-भीमा नदीजाेड प्रकल्पाच्या बोगद्याबाबत महत्वाची बातमी 

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या नीरा-भिमा नदी जोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु असून आत्तपर्यत बोगद्याचे निम्यापेक्षा जास्त काम १३.०७२ कि.मी पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन ठिकाणी बोगदे एकमेकांना जोडण्यामध्ये यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी  असणाऱ्या नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम इंदापूर तालुक्यामध्ये  जोरात सुरु आहे. बोगद्यामध्ये जाण्यासाठी सहा ठिकाणी शाॅप्ट (खोल विहिरी) खोदल्या आहेत. या शॉप्टमधून बोगद्यातील दगड व इतर मटेरियल बाहेर काढण्यात येते. तसेच कर्मचाऱ्यांना ही याच शाॅप्टमधून लिप्टच्या साहय्याने ये-जा सुरु असते. हे सहा शॉप्ट एकमेकांना जमीनीखालून बोगद्याच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरु आहे.

यातील शाॅप्ट क्रमांक चार व पाच, पाच व सहा एकमेकांना जोडण्यात यश आले आहे.  बोगद्याची एकूण लांबी २२.२४ कि.मी.असून या आत्तापर्यंत १३.०७२ कि.मी लांबीमध्ये म्हणजे निम्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. नीरा नदीमधून पावसाळ्यात वाहून जाणारे ७ टी.एम.सी पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. व ते पाणी भीमा नदीतून जेऊरच्या बोगद्याच्या माध्यमातून सीना-कोळेगाव प्रकल्पामध्ये जाणार आहे.

या प्रकल्पामधून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील बीड व उस्मानाबाद जिल्हातील दुष्काळी पट्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल अशी योजना आहे.
 बारामती तालुक्यातील साेनगावमधून बोगद्याला सुरवात झाली असून इंदापूर तालुक्यातील तावशी-सपकळवाडी-सणसर-शिंदेवाडी-अकोले मार्ग भादलवाडीपर्यंत बोगदा जाणार आहे. भादलवाडीमध्ये उजनी जलाशयामध्ये सोडण्यात येणार आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोगद्याच्या सुरवातीला  व शेवटी  दोन्ही बाजूला ६०० मीटर लांबीचा उघडा कालावा असणार आहे. मार्च २०१७ पासुन बोगद्याचे वेगाने काम सुरु आहे. एका दिवसामध्ये एका बाजूने सुमारे अडीच मीटर काम होत  असून सहा ठिकाणी ५०० पेक्षा जास्म मजूर कार्यरत आहेे.  दररोज सरासरी २५ मीटर लांबीचा मीटर बोगदा तयार होत आहे. अकोलेमध्ये दोन ठिकाणी बोगदे एकमेकांना जोडण्यात आले आहेत.  बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यामध्ये ४३ दिवसामध्ये १८७२ क्युसेक विर्सगाने बोगद्यातुन ७ टीएमसी पाणी नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये जाणार आहे.  चालू वर्षी जून महिन्यापासुन आत्तापर्यंत सुमारे २९ टीएमसी पाणी नीरा नदीतून वाहून गेले आहे. वाहून जाणाऱ्या सात टीएमसी पाण्याचा उपयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकल्पाची वैशिष्टे...
प्रकल्पाची एकूण लांबी - २३.८० कि.मी
बोगद्याची लांबी- २२.२४ कि.मी.
बोगद्याची उंची- ८ मीटर
बोगद्याची रुंदी- ८.२५ मीटर.
बोगद्याचे पूर्ण काम- ९.६०
बोगद्याची जमीनीपासून खोली ४० ते ८३ मीटर
काम पूर्ण झाल्यानंतर ४३ दिवसामध्ये १८७२ विर्सगाने ७ टीएमसी पाणी नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)