esakal | शेतकऱ्यांच्या शेतमालाबाबत असणारी महत्वाची योजना एकदा वाचाच...

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या शेतमालाबाबत असणारी महत्वाची योजना एकदा वाचाच...}

'विकेल ते पिकेल' संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

pune
शेतकऱ्यांच्या शेतमालाबाबत असणारी महत्वाची योजना एकदा वाचाच...
sakal_logo
By
जनार्दन दांडगे

उरुळी कांचन : शेतकऱ्यांच्या मालाला थेट  ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने नवीन पिकेल ते विकेल ही योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून यातील साखळी नष्ट होऊन दोन्ही घटकाला त्याचा फायदा व्हावा असा सरकारचा प्रयत्न आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'विकेल ते पिकेल' संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या धोरणाचा एक भाग म्हणून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची  सुरुवात करण्यात आली असल्याचे मत मंडळ कृषी अधिकारी गुलाबराव कडलग यांनी मांडले. उरुळी कांचन (ता. हवेली) येथे संत शिरोमणी रयत बाजारअंतर्गत 'विकेल ते पिकेल' या बाजाराचा प्रारंभ करण्यात आला यावेळी कडलग बोलत होते. 

यावेळी बोलताना कडलग म्हणाले, ''राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून विकेल ते पिकेल अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून संत सावतामाळी रयत बाजार अभियान शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र सर्वजनिक शेतकरी उत्पादक गट तसेच बचत गटातील महिलांनी तयार केलेले पदार्थ, इंद्रायणी तांदूळ हळद तसेच सेंद्रिय पदार्थही विक्रीस ठेवण्यात आले होते.''

यावेळी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, कृषी पर्यवेक्षक रामदास डावकर, कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर, शंकर चव्हाण, महेश महाडिक, माजी सरपंच दत्तात्रय कांचन,  सर्वज्ञ शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र टिळेकर, सुभाष टिळेकर, धनंजय टिळेकर, मयूर कांचन, अलंकार कांचन आदी शेतकरी व  पदाधिकारी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, राज्य सरकारने शेतकरी ते थेट विक्री यावर एक चांगली वस्तू निर्माण करण्यासाठी शासनाने आता एक पाऊल उचलले आहे. बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशा दोन्ही उद्देशाची संकल्पना राज्यात सुरू करण्यात येत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)