esakal | कॉन्ट्रॅक्टर्सवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे का? राणेंचा सवाल | Rane
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

कॉन्ट्रॅक्टर्सवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे का? राणेंचा सवाल

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यातील खड्ड्यांच्या (potholes) स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आज संध्याकाळी ६ वाजता तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यातील खड्ड्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting) गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. मुंबई, (Mumbai) कल्याण-डोंबिवलीचं नव्हे, तर राज्यातल्या सर्वच भागात पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत.

रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यांमध्ये रस्ते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर पडलेल्या खड्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आता याच मुद्दावरुन कणकवलीचे भाजपा आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा: 'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - न्यूयॉर्क टाइम्स

"मुख्यमंत्री सर्व संबंधित यंत्रणांना भेटत आहेत व मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी इंजिनिअर्सवर निश्चित करत आहेत. रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना कर दात्यांचा पैसा दिला जातो. पण तरी ते त्यांचे काम चोख करत नाहीत. मग मुख्यमंत्री कंत्राटदारांना शासना का करत नाही?" असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

हेही वाचा: SBI बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती; 600 हून अधिक पदांवर मिळणार 'नोकरी'

"शिवसेनेच्या जवळ असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे? की, ही फक्त नौटंकी आहे" अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

loading image
go to top