

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशातील खंडवा येथून मुंबईत आलेल्या इमरान शेख (वय ३५) याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) चौकीतील कोठडीत मृत्यू झाला. या घटनेची चौकशी महाराष्ट्र पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आली आहे. इमरानच्या नातेवाइकांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने इमरानची वागणूक असामान्य होती, असा दावा केला आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे सीआयडीकडून तपास सुरू आहे.
इमरान दोन दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात मुंबईत आला होता. रविवारी (ता. २०) सकाळी तो खंडव्याला जाणाऱ्या रेल्वेबाबत माहिती घेण्यासाठी सीएसएमटीतील आरपीएफ चौकीत गेला होता. याच वेळी तेथे वाद झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. नातेवाइकांच्या आरोपानुसार, वादानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी इमरानला मारहाण करून जखमी अवस्थेत कोठडीत ठेवले. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार इमरानची वागणूक असामान्य होती. काही जण आपला जीव घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तो सांगत होता. त्याने आरपीएफच्या उपनिरीक्षकावरही हल्ला केला. शौचालयात गेल्यावर तो बाहेर न आल्याने दरवाजा उघडण्यात आला. त्या वेळी तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.