esakal | माळेगावात दोन व्यापाऱ्यांची हाणामारी इतर विक्रत्यांना पडली महागात
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

माळेगावात दोन व्यापाऱ्यांची हाणामारी इतर विक्रत्यांना पडली महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) हद्दीत राज्यमार्गालगत मंडईचे गाडे लावण्यावरून आज ( सोमवारी) दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी सुमारे शंभर फळ व भाजी विक्रत्यांना महागात पडली. करचे व बागवान या व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना विचारात घेत पोलिसांनी सर्वच भाजीपाला व फळ विक्रत्यांचे अतिक्रमण काढण्याबाबत ठोस भूमिका घेतली. परिणामी शंभर पेक्षा अधिक विक्रत्यांना विस्तापित व्हावे लागते.

अर्थात ही ठोस कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल घुगे यांच्या अधिपत्याखाली झाल्याचे सांगण्यात आले. वास्तविक माळेगावचे प्रशासक तथा तहसीलदार विजय पाटील यांनी दोन महिन्यापुर्वी अशीच गावात अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. परंतु काही दिवसातच मुख्य रस्त्याच्या कडेला फळ व भाजीविक्रत्यांनी विळखा घातला होता.

हेही वाचा: माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांच्या घरात चोरी

सोमवारी झालेल्या पोलिसांच्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे पुन्हा एकदा रस्त्यालगतचा भाग पुर्णतः मोकळा झाल्याचे दिसून आले. तसेच शिवाजी चौक, राजहंस चौकातही प्रवाशांना मोकळीत मिळाली.  दरम्यान, माळेगावात सोमवारी नेहमी प्रमाणे राजहंस चौक, शिवाजी चौकासह राज्यमार्गालगत मोठ्या प्रमाणात मंडई भरली होती. या मुख्य रस्त्यालगत दिवसेंदिवस मंडई विक्रत्यांची संख्या वाढतच चालली होती.

परिणामी रस्त्यावरच ग्राहकांची गर्दीही त्या तुलनेत वाढल्याने प्रवशांसह वाहन चालकांना प्रवास करताना अडचण होत होती. ही प्रतिकूल स्थिती निर्माण झाली असतानाच आज फळविक्रता कुरबान बागवान आणि करचे कुटुंबियांमध्ये फळाचा गाडा लावण्यावरून वाद झाला. त्याचे पर्य़ावसन तुंबळ हाणामारी झाले.

दोघांनी एकमेकांचे गाडे रस्त्यावर ढकलून दिले.  हा प्रकार रस्त्यावरच झाल्याने दोन गटात काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्याचवेळी पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. तसेच वादग्रस्त ठरलेल्या बागवान आणि करचे कुटुंबियांवर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्या प्रकरणी कायदेशिर कारवाई केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

loading image
go to top